अविवाहितांसाठी Marathi ukhane avivahitansathi

Followers

Marathi Ukhane for Women

Marathi Ukhane for Women 

 गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
----- नाव घेते सोडा माझी वाट

आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले
--- चं नाव घ्यायला --- अडवले

हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात
---- बसले दारात मी जाऊ कशी घरात

घराच्या पुढे अंगण अंगणात सजलाय बोगनवेल ,
प्रवेश करते गृहलक्ष्मी , वाजवून ...च्या घराची बेल

गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास,
.... चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास

माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले,
म्हणून ........ रावांची मी सॉभाग्यवती झाले

गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,
..... च्या हातात हात देउन झाले मी निर्भर

माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा.
... नी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा.

अधिक वाचा »

FUNNY marathi Ukhane

१) बागे मध्ये असतात गुलाबाच्या कळ्या
गणपतरावांचे दात म्हणजे दुकानच्या फळ्या

२) इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर
……………..च नाव घेते …………… ची लव्हर

३) वन टू थ्री ……………………
…….. चे नाव घेते मला करा फ्री

४) कापवर कप सात कप त्यावर ठेवली बशी
माझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी

५) स्टुलावर स्तुला बत्तिस स्तुल
………… राव एकदम ब्यूटिफुल

६) …….. चा नि माझा संसार होईल सुखकर
जेव्हा मी चीरेन भाजी आणि तो लावेल कुकर

७) गाडीत गाडी डेक्कन क्वीन
……… आहे माझी ब्युटी क्वीन
अधिक वाचा »

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे १०१ उखाणे - 101 Ukhane

१       रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन
   ----------  रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन
२ नव्या आयुष्याची नवी नवी गाणी
   --------- च्या घराण्यात ---------- रावांची झाले मी राणी
३       पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
   ---------- रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते
४  सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
    ---------- रावाचं नाव ह्ळुच ओठी येई
५    हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
    ------ रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी
६     शिंपल्यात सापडले माणिक मोती
    ------ रावांच्या जीवनात झाले मी सारथी
७         महादेवाला बेल,विष्णूला तूळ्स
    ------ रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस
८         आंनदाने भरला दिन हा लग्नाचा
    ----- रावांना घास देते गोड जिलेबीचा
९         मनाच्या व्रुंदावनात आंनद डोलते भावनेची तुळस
    ----- रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळ्स
१०         आई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी
    ----- रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टी
११         सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी
    ----- रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी
१२         सुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैजंण
    ----- रावांचे नाव घेते ऐका सारेजण
१३         सासरचे निराजंन माहेरची फुलवात
    ----- रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात
१४         जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
    ----- रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
१५         माहेर जणू गंगा, सासर जणू सागर
    त्यातच एकरुप ----- रावांचे सूख निर्झर
१६         आकाशाच्या अंगणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश
    ----- रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश
१७         पायातल्या जोडव्यात माहेरची स्म्रुती
    ----- रावांच्या स्नेहाने गेली माझी भिती
१८         सत्य प्रुथ्वीचा आधार, सूर्य स्वर्गाचा आधार
    यज्ञ देवतांचा आधार ----- राव माझे आधार
१९          मंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती
     ----- रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती
२०          पित्याचे कर्तव्य संपले, कर्तव्याला माझ्या सुरूवात
     ----- रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात
  गजाननाची क्रुपा, गुरुंचा आशीर्वाद
----- रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात
२२ सुर्यबिंबाचा कुंकुम तिलक, प्रुथ्वीच्या भाळी
----- रावांचे नाव घेते ------ च्यावेळी
२३संसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा
----- रावांचे नाव घेऊन, मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा
२४   स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी
----- रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्यावेळी
२५    रुप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा
-----रावांचे नाव घेते मिळो आशिर्वाद तूमचा
२६     नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा
----- रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छा
२७     मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार
----- रावांच्या रुपाने झाला साक्षात्कार
२८     हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी
----- रावांच्या जीवनात आहे मला गोडी
२९     सर्वाना नमस्कारासाठी जोडते हो हात
----- रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट
३०     भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
----- रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची
३१     जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले
----- रावांच्या नावाकरीता एवढे का अडविले
३२     शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान
----- रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मान
३३     आत्मरुपी करंडा, देहरुपी झाकण
----- रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण
३४     कुलीन घराण्यात जन्मले, कुलवान घराण्यात पडले
----- रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले
३५     माहेरच्या ओढीने डोळे येतात भरुन
----- रावांच्या संसारात मन घेते वळून
३६     लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी
----- रावांचे नाव घेते तुमच्यासाठी
३७     संसाररुपी कादंबरीचे उघडले पहिले पान
----- रावांचे नाव घेऊन तुमचा करीते मान
३८     लक्ष्मी शोभते दागदागिन्यांनी, विद्या शोभते विनयाने
----- रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाने
३९     संसाररुपी सागरात प्रेमरुपी सरोवर
आयुष्याचा प्रवास करते ------ रावांबरोबर
४०     नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा
----- रावांचे नाव असते ओठांवर, पण प्रश्न असतो उखाण्याचा
४१  सुखी संसारात हवी विश्वासाची जोड
----- रावांचे नाव घेते, घास घालून तोंड करते गोड
४२ अरुणासह ऊषा आली, सोनियाची प्रभा पसरली
----- रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली
४३ नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
आजपासून मी झाले ----- रावांची ग्रुहमंत्री
४४ शब्द तिथे नाद कवी तिथे कविता
----- रावांची जोड जणू सागर आणि सरिता
४५   नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पर्दापण
----- रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण
४६     चंदनाच्या झाडावर बसला मोर
----- रावांच्या जीवावर मी आहे थोर
४७     चंद्राचा उदय, समुद्राला भरती
----- रावांच्या शब्दांनी सारे श्रम हरती
४८     सूख समाधान तिथे लक्ष्मीचा वास
----- रावांना देते मी जिलेबीचा घास
४९     पदस्पर्शाने लंवडते उंबरठ्यावरलं माप
----- रावांची भाग्यलक्ष्मी म्हणुन ग्रुहप्रवेश करते आज
५०     घराला असावं अंगण, अंगणात डोलावी तूळस
----- रावांच्या जीवनात चढवीन आंनदाचा कळस
५१     सूख दू:खाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले
----- रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले
५२     अंलकारात अंलकार मंगळसूत्र मूख्य
----- रावांचा आनंद हेच माझे सौख्य
५३     मंगळ्सूत्र हा सौभाग्याचा अंलकार
----- रावांच्यासह ध्येय, आशा होवोत साकार
५४     आकाशाच्या पोटी चंद्र, सूर्य, तारांगणे
----- रावांचे नाव घेते तूमच्या म्हणण्याप्रमाणे
५५     नीलवर्ण आकाशात चमकतात तारे
----- रावांचे नाव घेते लक्ष दया सारे
५६     सांयकाळ्चे वेळी नमस्कार करते देवाला
----- रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला
५७     इग्रंजी भाषेत चंद्राला म्हणतात मून
----- रावांचे नाव घेते ----- ची सून
५८     खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड
----- रावांचे नाव अम्रुतापेक्षा गोड
५९     इग्रंजी भाषेत आईला म्हणतात मदर
---- रावांचे नाव घेते सोडा माझा पदर
६०     फुलात फुल जाईचे फुल
----- रावांनी घातली मला भूल
६१  साता जन्मीची पूण्याई फळाला आली आज
----- रावांच्या हाताने ल्याले मंगळ्सुत्राचा साज
६२ पत्रिका जुळ्ल्य़ा योग आला जूळून
----- राव पती मिळावे म्हणून नवस केला कुलदेवतेला स्मरुन
६३  संसार सागरात प्रीतीच्या लाटा
----- रावांच्या सुखदु:खात उचलीन मी अर्धा वाटा
६४  आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस
-----राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस
६५    सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह
----- रावांचे नाव घेण्यास नको मला आग्रह
६६     लाल चूटूक मेंदी, हिरवागार चुडा
----- रावांसाठी जीव झाला माझा वेडा
६७     आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर
आयुष्याचा प्रवास करीन ----- रावांच्या बरोबर
६८     आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा
----- राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा
६९     सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी
----- राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी
७०     मनोभावे प्रार्थना करुन पुजला गौरीहर
----- रावांचा सहवास लाभो जन्मभर
७१     प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी
जीवनाचे पूष्प वाहिले ----- रावांच्या चरणी
७२     चांदीच्या ताटात पक्वानांची रास
----- रावांना देते लाडूचा घास
७३     रंगबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते
लाडूचा गोड घास ----- रावांना देते
७४     मंगळागौरीची पूजा मनोभावे करते
----- रावांसाठी दीर्घायुष्य मागते
७५     चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल
----- रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊल
७६     नातेवाईक जमले केले मोलाचे आहेर
----- रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर
७७     उंबरठयावरचं माप पायांनी लोटते
----- रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते
७८     आई, बाबा येते आशीर्वाद दयावा
----- रावांचा सहवास जन्मभर लाभावा
७९     ----- रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन
आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन
८०     मोत्याची माळ, सोन्याचा साज
----- रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आज
८१ मंगळागौरी माते नमन करते तुला
----- रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मला
८२ दिवाळीच्या सणाला दिव्यांच्या पंक्ती
----- रावांना ओवाळते मंगल आरती
८३    थोर कुळांत जन्मले, सुसंस्कारात वाढले
----- रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले
८४    सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा
----- रावांच्या सहवासात आनंदाला नाही तोटा
८५    मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा
----- रावांच्या संसारात लावीन दिप नवा
८६     संसाराच्या वेलीवर फुलले नवे फुल
----- रावांना लागली बाळाची चाहूल
८७     फुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे
----- रावांच्या बाळाचे आज आहे बारसे
८८     गुलाबांचा ताटवा, लतांचा कुंज
----- रावांच्या बाळाची आज आहे मौंज
८९     गोकुळात आला क्रुष्ण, सर्वांना झाला हर्ष
----- रावांच्या बाळाला लागले पहिले वर्ष
९०     सोन्याची घुंगरं, चांदीच्या वाळ्या
सोनार घडवी दागिने ----- रावांच्या बाळाला
९१     वरातीच्या मिरवणूकीत सनईचे करुण सूर
----- रावांच्या बरोबर जातांना मनात होते हूरहूर
९२     दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र
----- रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र
९३     अंबाबाईच्या देवळासमोर ह्ळ्दीकुंकवाचा सडा
-----रावांच्या नावावर भरते लग्नचुडा
९४     आला श्रावणमास, पाऊस पडला शेतात
----- रावांचे नाव घेते धनधान्यसंपन्न घरात
९५     शरदाचे चांदणे, मधुवनी फुले निशी़गंध
----- रावांचे नाव घेण्यात मला आहे आनंद
९६     जीवनात ही घडी अशीच राहू दे
----- रावांचे प्रीतफुल असेच हसु दे
९७     संथ वाहती गंगा, यमुना, आणि सरस्वती
----- रावांचे नाव हीच माझ्या प्रेमाची महती
९८     कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात
----- रावांचे नाव घेते माझ्या मनात
९९     श्रीरामाच्या पाऊली वाहते फुल आणि पान
----- रावांचे नाव घेते, राखते सर्वांचा मान
१००     निळया आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे
लग्नाच्या दिवशी ----- स वाटे ----- रावांचे नाव घ्यावे
१०१ नागपंचमीच्या सणी सख्या पुजती वारुळाला
----- रावांविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला
अधिक वाचा »

व्हाटसअप मराठी विनोदी स्टेटस - Whatsapp Marathi Funny Status

१. काय माहीत रावं तिला तिच्या सौंदर्याचा एवढा का गर्व आहे..
बहूतेक तिचं आधार कार्ड आजुन आलेल नसेल..!

२. नशीबवान त्यांना म्हणावं ज्यांना खरं प्रेम मिळतं.,च्यायला आम्हाला
वेळेवर रिक्षापण भेटत नाही…

३. GF‬ सोडून गेली तर, मग जाऊ दे ना…कारण …..पुराना‬ जायेगा तभी तो, ‪‎नया‬ आयेगा.

४. आजकालच्या ‪मुलीँना‬ हिरो आवडतात. ‪रनबीर, वरुण‬ सारखे आणि
‪‎BOYFRIEND‬ असतो ‪दगडू‬ सारखा….

५. मुलीना अक्कल असते का ?

६. केल होत म्या भी एकदा "प्रेम" पन तिन पार माझ्या "काळजाच" तुकड तुकड
करुन टाकल…….!!

७. नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..

८. काळजाचं पाणी पाणी झाल जेव्हा ती बोलली….मी तुझाकडुन प्रेम शिकले…
दुसर्या कोणावर करण्यासाठी

९. जिवनामध्ये लोक जळायला आणि विना कारण भाडंणे व्हायला लागली कि समजून
जा…. तुम्ही फ़ेमस होत आहात

१०. हे देवा मला माझासाठी काहीच नको, फक्त माझ्या मित्राना चांगली वहिनि भेटू दे..

११. आपले मित्र ना "राजा" ना "वजीर" पण मॅटर झाल्यावर दोन मिनटांत "हाजीर"...

१२. प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात सिरियस आहे का..?

१३.एकदा प्रेमात धोखा भेटला तर आता प्रेमातला सिरियस पना गेला राव

१४. आईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या शिव्या

१५. मुर्खांशी वाद घालू नये त्यांची संख्या एक ने वाढते

१६. जगतोय मस्तीत … नापास झालोय चौथीत

१७. ‎कोणासाठी‬ कुणी तरी…. ‪देवाने‬ नक्की बनवलेले असते...फक्त तो
‪‎पत्ता‬ देव देत नाही

१८. ''पाहतेस काय प्रेमात पडशिल'

१९. तुम्ही माझा स्टेटस परत वाचलात … हे देवा !! माझ्या स्टेटस चे किती Fans आहेत

२०. Hmmmm.... माझ्या Status ची नक्कल करत आहात ना ..
अधिक वाचा »

सुंदर सुंदर उखाणे........Marathi Ukhane Nice ones

सुंदर सुंदर उखाणे........Marathi Ukhane Nice ones

 

"नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा ,

..........रावांचे नाव असते ओठावर पण प्रश्न असतो उखाण्यांचा !!"

"नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद ,
...........चे नाव घेते द्या सत्यनारायणाचा प्रसाद !"

"अमूल्य आहेत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद न सदिच्छा ,
असेच सदैव मी व ...........च्या पाठीशी राहा हि मनीषा !"

"कळी हसली ,फुल उमलले,मोहरून आला सुगंध,
..........च्या सोबतीत मला गवसला जीवनाचा आनंद !"

"आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद ,
.........चे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद!"

"एका वर्षात महिने असतात बारा,
......... या नावात सामावलाय आनंद सारा!"

"दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
.........चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी!"

"आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
...........चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा!"

 

अधिक वाचा »

प्राणायाम

प्राणायाम

pranayam
प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये संतुलित प्रमाणात प्रकर्षाने पाठवण्याची कला आहे. श्‍वासाद्वारे आत घेतलेला प्राणवायू फुफ्फुसाद्वारे रक्तामध्ये शोषून घेतला जातो आणि शरीरातील रक्ताभिसरण क्रियेद्वारे सर्व पेशींपर्यंत पाठवला जातो. पेशींच्या हालचालीसाठी ऊर्जाशक्ती प्राणवायूद्वारे प्राप्त होत असते. यातून निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड वायू उच्छ्वासावाटे बाहेर टाकला जातो. पेशींची चैतन्यपूर्ण हालचाल प्राणवायूमुळेच शक्य होत असते.प्रत्येक पेशीचे शरीरातील विविध इंद्रियांमध्ये विशिष्ट कार्य निसर्गाने नेमून दिलेले असते. ते चांगले व्हावे, पेशी कार्यक्षम, निरोगी, चैतन्यपूर्ण राहाव्यात, यासाठी योग्य प्रमाणामध्ये प्राणवायू पोहचवणे हे प्राणायामाद्वारे साध्य होत असते.
प्राणायाम करत असताना मन सहज शांत अवस्थेकडे येते. मनातील विचार चक्रांचा वेग अगदी कमी होऊन जातो. श्‍वसनाचा वेगही खूपच कमी असतो. प्राणशक्तीद्वारा विश्‍वचैतन्यच शरीराच्या अणूरेणूतून संचरत असते. उत्साह वृद्धिंगत होत असतो आणि परमश्रेष्ठ असा आनंदमय अमृतानुभवाचा आस्वाद प्राप्त होतो.
अधिक वाचा »

किल्ले राजगड


किल्ले राजगड

raigad1

राजगड सर्वात उंच असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची १३९४ मीटर आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर व भोरच्या वायव्येला २४ की.मी. अंतरावर, नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्‍याच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे.राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. राजगडाला तीन माची व बालेकिल्ला आहे.
*मार्ग :-
पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात हा डोंगरी किल्ला असून, पुणे, भोर येथून गडावर जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत. कर्जत, पाली , पुणे, गुंजवणे बसस्थानकावरुन जाणाऱ्या रा.प. मंडळाच्या गाड्या किंवा खाजगी वाहन.
*गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :-
पद्मावती तलाव ,रामेश्वराचे मंदिर , राजवाडा , सदर , पाली दरवाज , गुंजवणे दरवाजा , पद्मावती ,माची , पद्मावती मंदिर , संजीवनी माची ,आळु दरवाजा , सुवेळा माची ,काळेश्वरी बुरुज आणि परिसर आणि बालेकिल्ला
अभेद्यतेचे दुसरे रुप असलेला बालेकिल्ला, चिलखती तटबंदीचे बांधकाम, नेढे अशी वैशिष्ट्ये बाळगणारा एकमेव गड म्हणजे ‘राजगड’. गडावरून निसर्गाच्या अकराळ-विकराळ पण तरीही सुंदर अशा स्वरूपाचे दर्शन होते. अतिशय देखणा पण चढण्यास अवघड असा हा किल्ला आहे.गडाचे रूप कायम चिरतरुण, लोभस असे. कुठल्याही ऋतूत पाहावे असे. त्याच्या पहिल्या दर्शनातच तो प्रेमात पाडतो. राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण 2 दिवस लागतात. गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा,सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.
अधिक वाचा »